सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

महागाईचं जातं...


महागाईच्या 'जात्यात' लोक भरडतात
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

पाऊस  नाहीं,पिक नाही कोरडं पडल रानं
जेवणार तरी काय, त्याचही विसरल भान
भूके पोटी लेकुरे ही चिरमुड़तात
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

'सुपात' राहून येतात, मतं मागायला
आता महागाई कमी करणार सांगायला
त्यांना कुठे दिसते, लोक चिरडतातं
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

तीच भाषा, तेच बोल, लोकाना ऐकवतात
जगण्यासाठी नवी आशा दाखवतात
मतं मागण्यासाठी  पाया पडतात
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

असं राजकारण कधीही पाहिल नव्हत
आता मनापासून वाटतं, की तेच खर होतं
की 'सुपातले' हसतात, 'जात्यातले' रडतात
महागाई कमी करा,पुन्हा 'नेतेच' ओरडातात