रविवार, १ जुलै, २०१२

आदर्श आग

काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग
"आदर्श" लोका मुळे त्या कागदांचा आला होता वैताग

पुर्वी जळत होती पापी लोकं, कर्मकांड जळतो आता
चल जाळून टाकूया  हा कर्मकांड, नी पुराव्यांचा खाता
आत्ता होऊन ते  बेफिकर फिरतात जाळून तो विभाग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग 

कधी कळणार तुम्हाला यांचे काळे धंदे, नी हा खेळ
विचार करा नि उतरवा नशा, आली आहे आता वेळ
सत्तेवरून खाली खेचा यानां,करून या  नेत्यांचा त्याग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग 

ना घडयाळ ना बाण ना हाथ ना इंजन, एकच जात
चला चला इतिहास घडवून संपवूया ही काळी  रात 
नवीन काहीं करुया, देशप्रेमाचा घेऊन आपला भाग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग 

आग कुठे लावतील, जाळून टाकण्या साठी पुरावे सारे
काही जन मेले तरी चालेल, जाळून बदनामीचे वारे
दिसते  ते  सत्तासुख,दिसत नाही हा  जनतेचा वैताग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग

एक दिवस असा येणार, पापी नेता जळून जातील
जाळेल जनता, जीव मुठीत घेवून पळून जातील
यांना माहित नाही जनशक्तीला कसा असतो  राग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा