शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

रडू लागला हा पाचोळा....





झाडाभोवती होवुनी गोळा
रडू लागला हा पाचोळा

झाडावरची पानं हे पाहून
मनातल्या मनांत हसून
झुलतात फांदी वर बसून
आता तुम्ही रडा वा लोळा
रडू लागला हा पाचोळा

पाचोळ्याला ते क्षण आठवतो
झाडावरील क्षण तो  साठवतो
ते सुख, हे दुख पोटात गाठवतो 
तुमच्या पोटात पण येईल गोळा 
रडू लागला हा पाचोळा


येते सगळ्याची एकदा वेळ 
आहे हा निसर्गाचा  खेळ 
सगळ्याच गोष्टीचा होतो मेळ 
सगळयाचाच होतो चोळा 
रडू लागला हा पाचोळा

इथं कुणी कुणासाठी नसतं 
सर्व  वेळेचा हा खेळ असतं 
यात सारं जीवनच  फसतं 
उन्ह ही लावून बसलाय डोळा
रडू लागला हा पाचोळा

सूर्य अजून तळपणारआहे 
पाचोळा बनवणार आहे 
हेच दिवस आणणार आहे 
वेळ फिरतो घेऊन झोळा 
रडू लागला हा पाचोळा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा