शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

रडू लागला हा पाचोळा....





झाडाभोवती होवुनी गोळा
रडू लागला हा पाचोळा

झाडावरची पानं हे पाहून
मनातल्या मनांत हसून
झुलतात फांदी वर बसून
आता तुम्ही रडा वा लोळा
रडू लागला हा पाचोळा

पाचोळ्याला ते क्षण आठवतो
झाडावरील क्षण तो  साठवतो
ते सुख, हे दुख पोटात गाठवतो 
तुमच्या पोटात पण येईल गोळा 
रडू लागला हा पाचोळा


येते सगळ्याची एकदा वेळ 
आहे हा निसर्गाचा  खेळ 
सगळ्याच गोष्टीचा होतो मेळ 
सगळयाचाच होतो चोळा 
रडू लागला हा पाचोळा

इथं कुणी कुणासाठी नसतं 
सर्व  वेळेचा हा खेळ असतं 
यात सारं जीवनच  फसतं 
उन्ह ही लावून बसलाय डोळा
रडू लागला हा पाचोळा

सूर्य अजून तळपणारआहे 
पाचोळा बनवणार आहे 
हेच दिवस आणणार आहे 
वेळ फिरतो घेऊन झोळा 
रडू लागला हा पाचोळा



रविवार, १ जुलै, २०१२

आदर्श आग



काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग
"आदर्श" लोका मुळे त्या कागदांचा आला होता वैताग


पुर्वी जळत होती पापी लोकं, कर्मकांड जळतो आता
चल जाळून टाकूया  हा कर्मकांड, नी पुराव्यांचा खाता
आत्ता होऊन ते  बेफिकर फिरतात जाळून तो विभाग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग 

कधी कळणार तुम्हाला यांचे काळे धंदे, नी हा खेळ
विचार करा नि उतरवा नशा, आली आहे आता वेळ
सत्तेवरून खाली खेचा यानां,करून या  नेत्यांचा त्याग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग 

ना घडयाळ ना बाण ना हाथ ना इंजन, एकच जात
चला चला इतिहास घडवून संपवूया ही काळी  रात 
नवीन काहीं करुया, देशप्रेमाचा घेऊन आपला भाग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग 

आग कुठे लावतील, जाळून टाकण्या साठी पुरावे सारे
काही जन मेले तरी चालेल, जाळून बदनामीचे वारे
दिसते  ते  सत्तासुख,दिसत नाही हा  जनतेचा वैताग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग

एक दिवस असा येणार, पापी नेता जळून जातील
जाळेल जनता, जीव मुठीत घेवून पळून जातील
यांना माहित नाही जनशक्तीला कसा असतो  राग
काय करणार, म्हणुन दिली होती त्याना लाऊन आग


शनिवार, ३ जुलै, २०१०

नवतालात जुनी गाणी...

येगं येगं  सरी नेत्याचे मडके भरी
सर आली धावून
नेत्याचे मडके गेले राहून
आमचे मडके गेले वाहून

येरे येरे रिश्वतखोर  पावसा
तुला देतो पैसा
पाऊस आला मोठा
पैसा वाटला छोटा
पाऊस झाले  बंद
म्हणाला पैसा हवा मोठा
तोच पाऊस ठरला खोटा

आला आला चुनावाचा वारा
संगे घेउन पैशाच्या धारा
पाठवणी तया सत्तेच्या सासरी
मीळवाया  सत्तेचा  आसरा

नेत्याची ही चाल तुरु तुरु
गुन्ह्याची केसं उडतात भुरु भुरु
सारी  दिशाच रात्रीत ढळली
प्रगतिची वाटच अडखळली

रात्रिस खेळ चाले या बार चांदण्याचा
संपेल ना कधीही हां खेळ बारवाल्याचा
नेता सांगणार आता हे खेळ बंद करणार
बार मध्ये जाऊन त्यास कोण धरणार

मंगळवार, २२ जून, २०१०

झोपेचं सोंग...

झोपेचं सोंग घेणाऱ्याना उठवणं  कठीण  असतं
जसं झोपी गेलेल्यांना  उठवणं खुप सोपं असतं

आता आम्हाला कसं माहित असणार की,
तो  खरोखरच झोपलाय,
की झोपेचं सोंग घेउन पडलायं
याला उठवणार  तरी कोण
कारण उठवणाराचं  दिला आहे परवाना
तरी  पण तो काही  झोपत नाहीं
काही कामकाज  पण करत  नाहीं
त्याला फ़क्त पाहिजे  झोपेचाच  बहाणा
परवाना देणारा खुपच व्याकुळ आहे
तळमळतो, कळवळतो
पाच  वर्षा नंतर तो सोंग मोडून उठतो
पुन्हा दारात येउन माथा टेकतो
आपलं हे असचं हिच लोकं पुन्हा परवाना देणार
आणि आपल हेच सरकार पुन्हा सोंग घेणार
पुन्हा तेच झोपेचं सोंग घेणार, असचं होणार 
आता याला कोण उठवणार? कसं  उठवणार?

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

जीवनगाणे


जीवनाचे असे हे गाणे
झाले आता फार जुणे 


जगण्यासाठी करावी धडपड
कधी खाली तर कधी वरचढ़.
जीवन हे असे कोण जाने
जीवनाचे असे हे  गाणे 


कधी मरता मरता जगतो
कधी जगता जगता मरतो
जसे उडवीले एक नाणे 
जीवनाचे असे हे गाणे 

जीवन झुल्यात झुलवतो
खाली तर कधी वर जातो
कधी अधिक तर कधी उणे 
जीवनाचे असे हे गाने

क्षण कधी मोजतो दुःखाचे
विसरतो ते क्षण सुखाचे
सुख कमी जसे चार आने
जीवनाचे असे हे गाणे 

अता  वारं  ही  शांत  झालं
असं   हे  जीवनाचं   अंत  झालं
संपले  शारीर  असे  हे   जुणे 
जीवनाचे असे हे गाणे 


बुधवार, ३० डिसेंबर, २००९

जीवनाचे मडके....

मातीत "जीवन" ओतून चिखल तुडवतो.
चाकावर  चिखल थोपुन  मडके घडवतो.


जीवनाच्या चाकावरती फिरता फिरता,
क्षण कधी  हसवतो नी कधी  रडवतो.


चाकावर सोनेरी क्षण मोजतो कधी,
सुवर्ण दागीन्यात जसे मोती जडवतो.


मनाशीच बोलतो,  लपंडाव खेळतो,
चाकालाही  का  कुठे तरी अडवतो.

मडके घेउन फिरतो चितेभोवती,
काम झाले की जमिनीवर बडवतो.

अता चुर झाले जीवनाचे मडके, 
पुन्हा तेच चुरा मातीत  सडवतो.

"जीवन" ओतून पुन्हा चाकावर चढवतो,     
गरागर  फिरवून पुन्हा मडके घडवतो.

बुधवार, २३ डिसेंबर, २००९

मुंबई नगरी आपली...

अशी ही  मुंबई  नगरी आपली
जरा माणसाच्या गर्दीने  तापली


बसणारे  थांबुन राहतात
चालणारे धावत सुटतात
शेवटी ही  माणसावरच  टपली


लोकल मध्ये सारेच कोंबतात
काहीजन झोपेतच थांबतात 
इथे माणसानेच "माणसे" मापलीं


इथे वडापाव आहे खायला
सोबत पाणी आहे प्यायला
झोपून पूरी फुटपाथच  व्यापली


इथे जे लोकं राहतात
जगता जगताच मरतात,
माथी   घेउन जगण्याची टोपली


मुंबईची रक्तवाहिनी भरली खचून.
इथे लोकं भरतात सारे  ठेचुन.
रक्तविकाराच्या भीतीने "ही" चोपली.
अशी ही मुंबई नगरी आपली.