मातीत "जीवन" ओतून चिखल तुडवतो.
चाकावर चिखल थोपुन मडके घडवतो.
जीवनाच्या चाकावरती फिरता फिरता,
क्षण कधी हसवतो नी कधी रडवतो.
चाकावर सोनेरी क्षण मोजतो कधी,
सुवर्ण दागीन्यात जसे मोती जडवतो.
मनाशीच बोलतो, लपंडाव खेळतो,
चाकालाही का कुठे तरी अडवतो.
मडके घेउन फिरतो चितेभोवती,
काम झाले की जमिनीवर बडवतो.
अता चुर झाले जीवनाचे मडके,
पुन्हा तेच चुरा मातीत सडवतो.
"जीवन" ओतून पुन्हा चाकावर चढवतो,
गरागर फिरवून पुन्हा मडके घडवतो.
चाकावर चिखल थोपुन मडके घडवतो.
जीवनाच्या चाकावरती फिरता फिरता,
क्षण कधी हसवतो नी कधी रडवतो.
चाकावर सोनेरी क्षण मोजतो कधी,
सुवर्ण दागीन्यात जसे मोती जडवतो.
मनाशीच बोलतो, लपंडाव खेळतो,
चाकालाही का कुठे तरी अडवतो.
मडके घेउन फिरतो चितेभोवती,
काम झाले की जमिनीवर बडवतो.
अता चुर झाले जीवनाचे मडके,
पुन्हा तेच चुरा मातीत सडवतो.
"जीवन" ओतून पुन्हा चाकावर चढवतो,
गरागर फिरवून पुन्हा मडके घडवतो.
'या जगण्यावर'चागंले लिखाण आहे.यापुढे असेच चागंले लिखाण करीत रहा.
उत्तर द्याहटवानविन वर्षामघ्ये तुमच्या लिखाणाबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत.भेटुया.
ohh!!! what a fabulous........Khoop chaan aahe hi poem.......fantastic
उत्तर द्याहटवाविठ्ठला, तू वेडा कुंभार ची आठवण झाली.
उत्तर द्याहटवा