अशी ही मुंबई नगरी आपली
जरा माणसाच्या गर्दीने तापली
बसणारे थांबुन राहतात
चालणारे धावत सुटतात
शेवटी ही माणसावरच टपली
लोकल मध्ये सारेच कोंबतात
काहीजन झोपेतच थांबतात
इथे माणसानेच "माणसे" मापलीं
इथे वडापाव आहे खायला
सोबत पाणी आहे प्यायला
झोपून पूरी फुटपाथच व्यापली
इथे जे लोकं राहतात
जगता जगताच मरतात,
माथी घेउन जगण्याची टोपली
मुंबईची रक्तवाहिनी भरली खचून.
इथे लोकं भरतात सारे ठेचुन.
रक्तविकाराच्या भीतीने "ही" चोपली.
अशी ही मुंबई नगरी आपली.
अगदी वास्तविक लिहिले आहे..
उत्तर द्याहटवामुंबई च्या रक्तवाहिन्या नुसत्याच भरल्या नाहीत, तर तुम्बल्यात देखील, ठाणे, नवी मुंबई, बेलापूर अश्या कैक "बायपास" करूनही झाल्यात. तरीही जगणे अवघड आहे.. हदय बंद नाही पडले म्हणजे कमावले..
आपला
साळसूद पाचोळा .
ya jagnaya var ya jalmawar shatatada pream karawe
उत्तर द्याहटवाya santanes pramanech pratak mumbakarla awadete te thmblelya nalya madhe anandmay kase rahayache.
svb