येगं येगं सरी नेत्याचे मडके भरी सर आली धावून नेत्याचे मडके गेले राहून आमचे मडके गेले वाहून येरे येरे रिश्वतखोर पावसा तुला देतो पैसा पाऊस आला मोठा पैसा वाटला छोटा पाऊस झाले बंद म्हणाला पैसा हवा मोठा तोच पाऊस ठरला खोटा आला आला चुनावाचा वारा संगे घेउन पैशाच्या धारा पाठवणी तया सत्तेच्या सासरी मीळवाया सत्तेचा आसरा नेत्याची ही चाल तुरु तुरु गुन्ह्याची केसं उडतात भुरु भुरु सारी दिशाच रात्रीत ढळली प्रगतिची वाटच अडखळली रात्रिस खेळ चाले या बार चांदण्याचा संपेल ना कधीही हां खेळ बारवाल्याचा नेता सांगणार आता हे खेळ बंद करणार बार मध्ये जाऊन त्यास कोण धरणार
झोपेचं सोंग घेणाऱ्याना उठवणं कठीण असतं
जसं झोपी गेलेल्यांना उठवणं खुप सोपं असतं आता आम्हाला कसं माहित असणार की, तो खरोखरच झोपलाय, की झोपेचं सोंग घेउन पडलायं याला उठवणार तरी कोण कारण उठवणाराचं दिला आहे परवाना तरी पण तो काही झोपत नाहीं काही कामकाज पण करत नाहीं त्याला फ़क्त पाहिजे झोपेचाच बहाणा परवाना देणारा खुपच व्याकुळ आहे तळमळतो, कळवळतो पाच वर्षा नंतर तो सोंग मोडून उठतो पुन्हा दारात येउन माथा टेकतो आपलं हे असचं हिच लोकं पुन्हा परवाना देणार आणि आपल हेच सरकार पुन्हा सोंग घेणार पुन्हा तेच झोपेचं सोंग घेणार, असचं होणार आता याला कोण उठवणार? कसं उठवणार?