सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

जीवनगाणे


जीवनाचे असे हे गाणे
झाले आता फार जुणे 


जगण्यासाठी करावी धडपड
कधी खाली तर कधी वरचढ़.
जीवन हे असे कोण जाने
जीवनाचे असे हे  गाणे 


कधी मरता मरता जगतो
कधी जगता जगता मरतो
जसे उडवीले एक नाणे 
जीवनाचे असे हे गाणे 

जीवन झुल्यात झुलवतो
खाली तर कधी वर जातो
कधी अधिक तर कधी उणे 
जीवनाचे असे हे गाने

क्षण कधी मोजतो दुःखाचे
विसरतो ते क्षण सुखाचे
सुख कमी जसे चार आने
जीवनाचे असे हे गाणे 

अता  वारं  ही  शांत  झालं
असं   हे  जीवनाचं   अंत  झालं
संपले  शारीर  असे  हे   जुणे 
जीवनाचे असे हे गाणे 


४ टिप्पण्या:

  1. जीवन झुल्यात झुलवतो
    खाली तर कधी वर जातो
    कधी अधिक तर कधी उणे
    जीवनाचे असे हे गाने

    क्षण कधी मोजतो दुःखाचे
    विसरतो ते क्षण सुखाचे
    सुख कमी जसे चार आने
    जीवनाचे असे हे गाणे

    किती यथार्थ .

    उत्तर द्याहटवा