बुधवार, ३० डिसेंबर, २००९

जीवनाचे मडके....

मातीत "जीवन" ओतून चिखल तुडवतो.
चाकावर  चिखल थोपुन  मडके घडवतो.

जीवनाच्या चाकावरती फिरता फिरता,
क्षण कधी  हसवतो नी कधी  रडवतो.

चाकावर सोनेरी क्षण मोजतो कधी,
सुवर्ण दागीन्यात जसे मोती जडवतो.

मनाशीच बोलतो,  लपंडाव खेळतो,
चाकालाही  का  कुठे तरी अडवतो.

मडके घेउन फिरतो चितेभोवती,
काम झाले की जमिनीवर बडवतो.

अता चुर झाले जीवनाचे मडके, 
पुन्हा तेच चुरा मातीत  सडवतो.

"जीवन" ओतून पुन्हा चाकावर चढवतो,     
गरागर  फिरवून पुन्हा मडके घडवतो.

बुधवार, २३ डिसेंबर, २००९

मुंबई नगरी आपली...

अशी ही  मुंबई  नगरी आपली
जरा माणसाच्या गर्दीने  तापली

बसणारे  थांबुन राहतात
चालणारे धावत सुटतात
शेवटी ही  माणसावरच  टपली

लोकल मध्ये सारेच कोंबतात
काहीजन झोपेतच थांबतात 
इथे माणसानेच "माणसे" मापलीं

इथे वडापाव आहे खायला
सोबत पाणी आहे प्यायला
झोपून पूरी फुटपाथच  व्यापली

इथे जे लोकं राहतात
जगता जगताच मरतात,
माथी   घेउन जगण्याची टोपली


मुंबईची रक्तवाहिनी भरली खचून.
इथे लोकं भरतात सारे  ठेचुन.
रक्तविकाराच्या भीतीने "ही" चोपली.
अशी ही मुंबई नगरी आपली.               

शनिवार, ५ डिसेंबर, २००९

मी नि तू..

मी काय नि तू काय,
दोघे पण एकच हाय.
दोघही राहतो, नि खातो.
तू पीत नाही, नि मी पितो.
करणार तरी काय ?
मी काय नि तू काय.

मी सगळ काम करतो,
दिस रात मरतो. 
माझ हे असाच हाय.
मी काय नि तू काय.

तू कामच करत नाही,
सांगतो भलताच काही.
मी हेच सांगनार  हाय.
मी काय नि तू काय. 

तू जवा हसतो,
मी  नक्की  फसतो.
मी करू तरी काय?
मी काय नि तू काय.

सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

महागाईचं जातं...


महागाईच्या 'जात्यात' लोक भरडतात
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

पाऊस  नाहीं,पिक नाही कोरडं पडल रानं
जेवणार तरी काय, त्याचही विसरल भान
भूके पोटी लेकुरे ही चिरमुड़तात
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

'सुपात' राहून येतात, मतं मागायला
आता महागाई कमी करणार सांगायला
त्यांना कुठे दिसते, लोक चिरडतातं
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

तीच भाषा, तेच बोल, लोकाना ऐकवतात
जगण्यासाठी नवी आशा दाखवतात
मतं मागण्यासाठी  पाया पडतात
महागाई कमी करा, कमी करा ओरडतात

असं राजकारण कधीही पाहिल नव्हत
आता मनापासून वाटतं, की तेच खर होतं
की 'सुपातले' हसतात, 'जात्यातले' रडतात
महागाई कमी करा,पुन्हा 'नेतेच' ओरडातात


रविवार, १५ नोव्हेंबर, २००९

समाजाची दोरी.

असंख्य धाग्यांनी बनलेली हि समाजाची दोरी.
त्यातील एक धागा जो दर्श्वितो बेरोजगारी .
एक धागा जो दार्श्वितो नेत्याची रीश्वतखोरी,
आणि काळाबाजारी. ,
त्यात एकाच धागा असा आहे,
जो दर्श्वितो इमानदारी.
तोडुन टाकावी हि दोरी.
एकदा वाटते जाळून टाकावी हि दोरी.
उकलून टाकावी हि दोरी.
तोडायाला गेलो तर आठवते आपलिच लाचारी.
जाळायला गेलो तर आठवतो तो एकच धागा.
जो दर्शवितो  ईमानदारी
उकलने तर होतच नाही फार फार गच्च
आहे हि समाजाची दोरी, फार फार गच्च
आहे हि समाजाची दोरी.